आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मावळ प्रतिनिधी : पठाण एम एस
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने रुद्राक्ष चायनीज अॅण्ड रेस्टॉरंट, गणपती मळा, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे येथे सोमवारी (दि. 27) मोठी कारवाई केली. यात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवलेला रेशनिंगचा 23 लाखांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांना माहिती मिळाली की, रुद्राक्ष चायनीज अॅण्ड रेस्टॉरंट, गणपती मळा, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे येथे बेकायदेशीरपणे रेशनच्या धान्याचा साठा करून ठेवला आहे. त्यानुसार दरोडा विरोधी पथकाने सोमवारी रात्री सातच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. रेशनचे गहू व तांदूळ अनाधिकृतपणे विक्री करुन नफा कमवत आहे. त्यासाठी त्याने रेशनच्या मालाचा साठा करून ठेवला आहे. स्वरूप हनुमंत पाटणकर याच्या ताब्यातून प्रत्येकी 50 किलो वजनाच्या तांदळाच्या 680 गोणी आणि गव्हाच्या 640 गोणी, तसेच एक शिलाई मशीन, आठ रीळ धागा असा एकूण 23 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, आणि त्यांच्या टीम , खंडणी विरोधी पथकाने केली आहे.