प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : लहान मुलाच्या मदतीने उत्तरेश्वर पेठेतील घरातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एकाला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलय. सुरेश सुदेश निकम असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 4 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा 4 लाख 14 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
उत्तरेश्वर पेठेत भक्ती कांडापुरे या कुटुंबियासंवेत राहतात. कांडापुरे यांच्या घरातील सोन्याचे दागिने लहान मुलाच्या मदतीनं चोरी केल्याचा प्रकार 4 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान घडला होता. याप्रकरणी 8 डिसेंबरला कांडापुरे यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिली होती. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत राजाराम चौक इथं राहणाऱ्या सुरेश निकम याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून 18 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल असा सूमारे 4 लाख 14 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विजय कोळेकर, संजय कोळी, रोहित मर्दाने, रणजित देसाई, गजानन परीट, सुहास पाटील, संदीप कुंभार यांनी केलीय.