ऑस्ट्रेलियाहून कोल्हापूर मध्ये आलेल्या एका कुटूंबातील व्यक्तिला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास

तपासणीसाठी त्याचा स्वॅब पुण्याच्या  प्रयोग शाळेत पाठविण्यात आला..



प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर : ऑस्ट्रेलियातून रमणमळा (कसबा बावडा) येथे आलेल्या एका व्यक्तिला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.दरम्यान, त्याला "ओमिक्रॉन व्हेरिएंट'ची लागण झाल्याची शंका आहे. याच्या तपासणीसाठी त्याचा स्वॅब पुण्याच्या  प्रयोग शाळेत पाठविण्यात आला आहे. चार ते सात दिवसांनी याचा अहवाल दिला जाईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सर्वच देशात खळबळ उडाली आहे.त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. यातच आज ऑस्ट्रेलियाहून कोल्हापूर मध्ये आलेल्या एका कुटूंबातील व्यक्तिला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर त्यांच्यासोबत आलेल्या इतरांची तपासणी निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.

पण, जी व्यक्ति कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्या व्यक्तिला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का? याची पडताळणी करण्यासाठी त्याचा स्वॅब पुण्याला पाठविण्यात आला आहे. तर संबंधीत व्यक्तिला होम क्वारंटाईन केले असून जोपर्यंत तपासणी अहवाल येत नाही, तोपर्यंत घराच्या किंवा खोलीबाहेर पडू नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या ओहत.

राज्यात कल्याण डोंबिवलीत पहिला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळून आला. यानंतर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड,आणि नागपुरमध्ये ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले. आता कोल्हापुरात ही संशियत रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post