दोघांना गव्याने गंभीररीत्या जायबंदी केले तर एकाची प्रकृती चिंताजनक
प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर परिसरात धुमाकूळ घालणार्या गव्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर यात इतर दोघांना गव्याने गंभीररीत्या जायबंदी केले आहे.यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
शनिवारी रात्री भुयेवाडी येथे स्वरूप संभाजी खोत या २०वर्षीय युवकाला उसाच्या शेतात हल्ला करून ठार मारल्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. जखमी दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रल्हाद पांडुरंग पाटील (48) व शुभम महादेव पाटील (20) असे जखमींचे नावे आहेत. सौरभ हा माजी सरपंच पूजा खोत आणि विद्यमान सदस्य संभाजी खोत यांचा मुलगा आहे. भुयेवाडीतील हरणेश्वर नगरमध्ये लक्ष्मण पाटील यांच्या उसाच्या शेतात गव्याने मागे वळून हल्ला केला.