ई-चलन रक्कम भरण्यास १० पर्यंत मुदत

 अन्यथा ११ रोजी लोकअदालतीमध्ये हजर राहा : वाहतूक पोलिसांच्या सूचना.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :  मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना ई-चलनाद्वारे दंड केला आहे. दीड ते दोन वर्षे झाली; मात्र अनेकांनी अनपेड रक्कम भरलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात ६ कोटी रुपये थकीत आहेत. वाहनधारकांनी १० डिसेंबरपर्यंत ही रक्कम भरावी; अन्यथा ११ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये हजर राहावे, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या 'वन स्टेट वन चलान' हे २०१९ पासून कोल्हापूर जिल्ह्यात कार्यान्वित झाले. वाहतूक पोलिसांकडील पावती बुक जाऊ ई-चलनची मशीन देण्यात आली. वाहनधारकांना ऑनलाईन ई-चलनाद्वारे दंडाची रक्कम भरता येते. ज्यांच्याकडे पैसे होते, ते वाहनधारक त्याच ठिकाणी दंडाची रक्कम भरून पावती घेत होते; मात्र पैसे नसणाऱ्यांना दंड भरण्यास मुदत दिली जात होती.

   गेल्या दीड-दोन वर्षात जवळपास ६ कोटी अनपेड रक्कम वाहनधारकांनी भरलेली नाही. वारंवार सूचना, नोटिसा, स्मरणपत्रे पाठवूनही वाहनधारकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अनपेड रक्कम न भरणाऱ्यांचे खटले राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पाठवले जाणार आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.

उघड्यावर मद्य प्राशन करणाऱ्या तिघांवर गुन्हा..

कसबा बावडा रोडवर खानविलकर पेट्रोल पंपाच्या पलीकडे असलेल्या रिकाम्या जागेत रात्रीच्या वेळी ओपन बार करून मद्य प्राशन करणाऱ्या तिघांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी रात्री ही कारवाई केली. अभिजित शहा (वय ४०), तौफिक नाकाडे (वय ३७), बनवारी पासवान (वय ३७) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेले मद्य त्याच ठिकाणी नष्ट केले आहे.

---

Post a Comment

Previous Post Next Post