56 लाख 74 हजार सहाशे रुपये किमतीचा दारू साठा हस्तगत केला.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : गोवा आणि कर्नाटकातून गोवा बनावट दारू आणि बिअरची होणारी तस्करी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुधवारी रोखली. सांगली जिल्ह्यातील मालगाव रोडवर भरारी पथकाने दारूने भरलेला कंटेनर ताब्यात घेऊन 56 लाख 74 हजार सहाशे रुपये किमतीचा दारू साठा हस्तगत केला.
गुरुमुख हरी सिंग (वय 44, रा. धरमकोट बिलासपूर, ता. जगधारी, जि. यमुनानगर, हरियाणा) या परप्रांतीय कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे गोवा आणि कर्नाटक येथून बेळगाव मार्गे सांगली जिल्ह्यातून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.