जागा कोणाला किती व कोणत्या द्यायच्या, या पेक्षा आघाडी सोबत राहण्याबाबत एकमत .
प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोेल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकी बाबत शुक्रवारी रात्री आमदार पी. एन. पाटील यांच्या राजारामपुरी येथील निवासस्थानी आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय काेरे व आमदार पाटील यांच्यात बैठक झाली.या मध्ये, जागा कोणाला किती व कोणत्या द्यायच्या, या पेक्षा आघाडी सोबत राहण्याबाबत एकमत झाले.
आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत चर्चा करण्याची जबाबदारी आमदार पी. एन. पाटील व आमदार विनय काेरे यांच्यावर सोपवली आहे. त्या नुसार शुक्रवारी उभय नेत्यांत सुमारे दाेन तास बैठक झाली. आमदार आवाडे यांनी 'पतसंस्था-बँक' व 'प्रक्रिया' अशा दोन गटांतून अर्ज भरले आहेत. मागील संचालक मंडळात आवाडे समर्थक विलास गाताडे हे इतर मागासवर्गीय गटातून बँकेत आले होते. पतसंस्था किंवा प्रक्रिया यापैकी एक जागा मला सोडा, या वर आवाडे ठाम राहिले असले तरी त्यांनी आघाडीसोबत राहण्याची निश्चित केल्याचे समजते.
महाडिक यांच्या सोबत सोमवारी चर्चा
महादेवराव महाडिक यांच्या सोबत सोमवारी (दि. ६) आमदार पी. एन. पाटील व आमदार विनय कोरे हे चर्चा करणार आहेत. त्यानंतर मंगळवारी (दि. ७) जिल्हा बँकेत मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी एकत्रित बैठक होऊन आघाडीबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे, तिथे राजकारण विरहित कारभार चालण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित यावे, या साठी आमचा प्रयत्न आहे. याबाबतच आमची बैठक झाली, या मध्ये सकारात्मक चर्चा झाली. - आमदार विनय काेरे