लोकप्रतिनिधीं कडून राजकीय इच्छा शक्ती दाखवायला हवी,
प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : औरंगाबाद येथे खंडपीठ राजकीय इच्छा शक्तीमुळे होत असेल कोल्हापुरात खंडपीठ का होत नाही..? त्या साठी लोकप्रतिनिधीं कडून राजकीय इच्छा शक्ती दाखवायला हवी, असे प्रतिपादन इस्लामपूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजीराव नलवडे यांनी केले
वकील हे न्याय व्यवस्थेचे हात आहेत. नवोदित वकिलांनी शॉर्टकटच्या नादी लागू नये. त्यांनी अभ्यास, शिस्तबद्धता आणि आत्मविश्वास अंगी बाळगावी असे मत माजी न्यायमूर्ती नलवडे यांनी व्यक्त केले.वकील संघटनेचे सदस्य ॲड. राजेंद्र ऊर्फ चिमण डांगे यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. कशीश जमादार, स्वरा घाडगे यांचा राष्ट्रीय धनुर्विद्या, स्केटिंग स्पर्धेत ऊल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार केला.
माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश वसंतराव पिसे, कोल्हापूर जिल्हा बारचे सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख, ॲड. बी. डी. पाटील, व्ही. आर. पाटील, इक्बाल मालदार, आर.ए. मोहिते, जे. एस. पाटील, डी. ए. जाधव, अतुल पाटील उपस्थित होते. संयोजन सचिव नितीन पाटील, दत्तात्रय मोहिते, श्रीकांत पाटील, नंदाताई शिंगटे, क्रांती पाटील, संतोषकुमार जाधव, अरविंद मोहिते, राहुल माळी, धनंजय पाटील, वाय.जे. मुल्ला, एच.आर. पवार, कौस्तुभसिंह मिरजकर, शिवाजीराव पाटील, सियाल मगदूम, अविनाश पाटील, अभयसिंह देसाई यांनी केले. अरविंद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी आभार मानले.
.