महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त

 वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी " रक्तदानाने " आदरांजली...!


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

कोल्हापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोल्हापूर शहरात डॉ. बाबासाहेबच्या पुतळा शेजारी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने भव्य रक्तदान शिबिरचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी 78 कार्यकर्त्यांनी रक्तदान करुन बाबासाहेब ना कोल्हापूर शहराच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

     


  कोल्हापूर महापालिकेचे उपायुक्त रविकांत आडसुळ व जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराध्यक्ष पुंडलिक कांबळे शहर उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विश्वास कांबळे, अस्मिताताई दिघे, डॉ.माधुरी चौगले, सचिन कांबळे, दशरथ कांबळे अमित नागटिळे, सचिन आडसुळे, नितीन कांबळे, प्रशांत कांबळे, आकाश कांबळे , विशाल कांबळे , बबन कावडे, मच्छिंद्र कांबळे, शिवाजी परळीकर अशोक परळीकर ,नागनाथ  खुरगळे, संजय गुदगे, गुणाजी कागलकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

      सेनापती कापशी ता. कागल येथे वंचित बहुजन आघाडी च्या 62 कार्यकर्त्यांनी रक्तदान करुन बाबासाहेबाना अभिवादन केले.पंचशील तरुण मंडळ सेनापती कापशी, व सेनापती कापशी जि प मतदार गट वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

      कागल तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आनंदाराव कांबळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत साताप्पा कांबळे व धनाजी सेनापतिकर यांच्या उपस्थित डॉ बाबासाहेब च्या प्रतिमेला अभिवादन करून रक्तदान शिबिराची सुरावत झाली.

        या वेळी प्रीतम कांबळे, ऋषिकेश कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

         हुपरी ता. हातकणंगले येथे हुपरी ग्रामस्थ, विविध आंबेडकरी पक्ष, संघटना व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी दर्शना साठी ठेवल्या होत्या.जिल्हा व परिसरातील हजारो आंबेडकर अनुयायानी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

       वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रा.विलास कांबळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विश्वास कांबळे, जिल्हा सह सचिव अरुण जमणे, जिल्हा आयटी प्रमुख सुमित कांबळे, शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडीचे नेते तम्माना कदम,आदी नी बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी चे दर्शन घेतले व अभिवादन केले या वेळी वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

          


विश्वास कांबळे , प्रसिद्ध प्रमुख

वंचित बहुजन आघाडी कोल्हापुर.

Post a Comment

Previous Post Next Post