प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुरलीधर कांबळे : कोल्हापूर :
कोल्हापूर -सन 2011 मध्ये जनगणना झाली प्रत्येक दहा वर्षानी होणारी जनगणना अद्याप झालेली नाही या मुळे वाढलेल्या लोक संख्येचा विचार करून राज्य सरकारने राज्यातील सर्व महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन प्रभाग रचने बरोबर आता महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या 11 ने वाढल्याने आता सदस्य संख्या 92 होणार आहे. या निर्णयामुळे राजकारणाचे शुद्धीकरण तर होईलच शिवाय राजकीय पक्षांची जबाबदारी वाढल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पक्षाच्या जास्तीजास्त कार्यकर्ते यांना संधी मिळेल. तसेच विकास कामे करतानाही सोयीचे होणार असल्याचे काही जणांनी सांगितलं.राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे शहराची लोकसंख्या वाढ़ली आहे अपुरा निधी , प्रभाग मोठा अशी परिस्थिती निर्माण होऊन कामे करताना अडचण येते. नगरसेवकांची संख्या वाढल्याने काम करने सोयीचे होईल सचीन चव्हाण. शहर अध्यक्ष .कॉ.आय.
नगरसेवकांना कोठे बसविणार ..? हा मोठा यक्ष प्रश्नच ..
आर .के .पोवार शहर अध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस.
राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाचा अभिप्राय घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे होता. आत्ताचे 81 नगरसेवकांना कशी तरी बसण्यास जागा निर्माण केली होती आता 92 नगरसेवकांना कोठे बसविणार ..? हा मोठा यक्ष प्रश्नच आहे.....