शनिवारपेठ इथं राहणाऱ्या राजेंद्र प्रतापराव काळे यांच्या फ्लॅटला आज सायंकाळी शॉर्ट सर्किटमुळं आग लागली.

 आगीत काळे यांच्या घरातील प्रापंचिक साहित्य जळुन खाक झालंय. या आगीत सुमारे 50 हजाराच नुकसान


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : शनिवारपेठ इथं राहणाऱ्या राजेंद्र प्रतापराव काळे यांच्या फ्लॅटला आज सायंकाळी शॉर्ट सर्किटमुळं आग लागली. या आगीत काळे यांच्या घरातील प्रापंचिक साहित्य जळुन खाक झालंय. या आगीत सुमारे 50 हजाराच नुकसान झालंय.

राजेंद्र प्रतापराव काळे हे शनिवार पेठेतील टपाल कार्यालयाजवळच्या पी एन आपर्टमेंट मध्ये कुटुंबियांसह राहतात. आज त्यांच्या जवळच्या नातेवाईकाकडे घरगुती कार्यक्रम असल्यानं त्यासाठी ते नातेवाईकाकडे गेले होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ते घरी परत येऊन विश्रांती घेत होते. आज सकाळपासून या परिसरातील विज पुरवठा बंद होता. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर त्यांच्या घरातील वीज मीटरमधून आवाज आला आणि अचानक पेट घेतला. अचानक घडलेल्या या प्रकारानं राजेंद्र काळे हे भयभीत झाले. त्यांनी फ्लॅट मधून बाहेर येऊन शेजाऱ्यांच्या मदतीनं घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अचानक वीज पुरवठा सुरू झाल्यानं शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या या आगीत काळे यांच्या घरातील प्रापंचिक साहित्य, इलेक्ट्रिक बोर्ड, वायरिंग, घरातील इलेकट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत काळे यांचे सुमारे 50 हजार रुपयांचं नुकसान झालंय. या आगीमुळे संपूर्ण फ्लॅटमध्ये धुराचं साम्राज्य होतं. हा फ्लॅट अपार्टमेंटच्या मागील बाजूस असल्यानं तिथं असलेल्या अंधारामुळं आग विझवण्यात अडचण येत होती. मात्र अग्निशमन दलाचे जवान दोन बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे डेप्युटी चीफ फायर ऑफिसर तानाजी कवाळे, फायरमन शैलेश कांबळे, सुरेंद्र जगदाळे, पुंडलिक माने आणि चालक सुरेश क्षीरसागर यांनी अर्धा तास प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली.

Post a Comment

Previous Post Next Post