राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात जलसंपदा विभागाला यश



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात बुधवारी दुपारी 3.15 च्या दरम्यान जलसंपदा विभागाला यश आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.

बुधवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना अपघाताने सर्व्हिस गेट उघडले होते. यामुळे नदीपात्राची पाणीपातळी वाढत होती.नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला होता. जलसंपदा विभागाच्या अथक परिश्रमानंतर राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला आहे. कोल्हापूरकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

Post a Comment

Previous Post Next Post