शिवसैनिकांनी पालिके समोर जोरदार शक्तीप्रदर्शन..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इस्लामपूर शहराचे इश्वरपूर असे नामकरण व्हावे या शिवसेनेच्या मागणीवरुन तसा ठराव करण्यासाठी पालिकेची विशेष सभा आज (शुक्रवार) बोलविण्यात आली. सभेपूर्वी शिवसैनिकांनी पालिके समोर जोरदार शक्तीप्रदर्शन केले.सेनेने शहरात राबविलेल्या स्वाक्षरी मोहीमेचे रेकार्ड घेवून जिल्हाप्रमुख आनंदराव पवार हे सभागृहात हजर झाले. तत्पुर्वी शिवसेना कार्यालयापासून शिवसैनिक भगवे फेटे नेसून, भगवे ध्वज हातात घेवून वाजत गाजत पालिकेत हजर राहिले होते. यावेळी पालिका आवारात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या नामांतरणाचा ठराव करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या या सभेला विरोधी राष्ट्रवादीच्या सर्व व सत्ताधारी विकास आघाडीच्या ४ नगरसेवकांनी गैरहजेरी लावली. ३२ पैकी फक्त ९ सदस्य उपस्थित होते. त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली.