प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इस्लामपूर : इकबाल पीरज़ादे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे हत्तेगांव येथील शेतकर्यांना आंदोलन करण्याची वेळ आली होती. उद्या रस्ता दुरूस्तीचे काम चालू न केल्यास शिराळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा माजी जिप उपअध्यक्ष सत्यजित देशमुख व रणधीर नाईक यांनी दिल्या नंतर
आंदोलनावेळी आधिकार्यांनी शुक्रवार पासून काम चालू करणेचे लेखी आश्वाशन दिले होते परंतु अधिकाऱ्यांनी आजपासूनचकामाची सुरुवात सुरूवात केले आहे .आश्वाशन मिळाल्यानंतर तबल दीड तास आदोलन सुरू होते. यावेळी तीन किलोमीटर वाहनांच्या लागलेल्या रांगा असताना अबूलन्शला रस्ता मोकळी करून शेतकऱ्यांनी मार्ग काढला.
यावेळी माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख युवा नेते रणधीर नाईक, संपतराव देशमुख, भाजपचे पांडूरंग गायकवाड, बाजीराव शेडगे ,मनोज चिचोलकर, दिनकर शेडगे, सरपंच रेखा पाटील, उपसरपंच संदीप चोरगे, कुमार कडोले ,उपसरपंच प्रमोद पाटील, माजी सरपंच पांडूरंग पाटील, विकास पाटील ,नंथूराम सावंत, किरण पाटील, सुनिल गुरव, बजरंग अस्कट, विकास शेडगे, विजय कुंभवडे, विकास शिरसट, सरपंच आनंदा सुतार, रंगराव शेडगे,याचेसह हजारो पुरूष व महिला आंदोलन स्थळी उपस्थित होते.