इचलकरंजी सह कोल्हापूर सांगली जिल्ह्यात आज पावसाचा जोर..
लक्षद्विप बेट समूह ते उत्तर किनारपट्टी या पट्ट्यात दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम आणि जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे कांदा, आंबा, द्राक्षे या फळ पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज (2 डिसेंबर) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडणार आहे. उद्या (3 डिसेंबर) रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.
चंद्रकांत जाधव यांची अंत्ययात्रा तीन वाजता निघणार..
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व यशस्वी उद्योजक आमदार चंद्रकांत जाधव यांचे हैदराबाद येथे दुःखद निधन झाले. हैदराबादमधून त्यांचे पार्थिव दुपारी एक वाजता काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आणण्यात येणार आहे. दुपारी १ ते १.३० वाजेपर्यंत काँग्रेस कमिटी कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सम्राटनगर येथील घरी पार्थिव नेण्यात येणार आहे. दुपारी १.३० ते ३ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव सम्राटनगर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.