समाजवादी प्रबोधिनीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी ता. ६ , भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वज्ञानावर आधारित सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक भूमिका मांडणारी आणि त्याआधारे प्रबोधन करणारी समाजवादी प्रबोधिनी ही एक दिशादर्शक संस्था आहे. या संस्थेच्या सर्वांगीण वृध्दीसाठी  प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. तसेच गेली बत्तीस वर्ष सुरू असलेले सकस वैचारिक शिदोरी देणारे 'प्रबोधन प्रकाशन ज्योती ' हे मासिक आणि गेली पस्तीस वर्षे कार्यरत असलेले शासनमान्य अ वर्ग प्राप्त एकोणतीस हजार ग्रंथांनी समृद्ध असलेले 'प्रबोधन वाचनालय 'हे उपक्रम बळकट करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याच बरोबर समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने जे उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमात आपला आर्थिक योगदानासह सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे. ती वर्तमान परिस्थितीची मागणी आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत अर्थतज्ञ प्रा.डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

प्रारंभी समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत, प्रास्ताविक अणि विषय पत्रिकेचे वाचन केले.

त्यांनी समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस कालवश आचार्य शांताराम गरुड, शहीद कॉ. गोविंद पानसरे आणि विद्यमान अध्यक्ष प्रा.डॉ. एन. डी. पाटील यांच्या वैचारिक वारशावर यापुढे अधिक सक्षमपणे कार्य करेल अशी खात्री देत त्यामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

सभेची सुरुवातीस ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख ते विलासकाका उंडाळकर आणि न्यायमूर्ती पी. बी. सावंत ते क्रांतिवीरांगना हौसाक्का पाटील अशा समाजवादी प्रबोधिनीशी निगडित व राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर अहवाल वर्षात कालवश झालेल्या सर्वाना आदरांजली  वाहण्यात आली.  त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. या सभेमध्ये प्राचार्य डॉ.टी. एस. पाटील, प्राचार्य डॉ.सुनील हेळकर ,राहुल खंजिरे, प्रा. डॉ.काशिनाथ तनंगे, बी.एस. खामकर, डॉ. संजय साठे, प्रा. डॉ.त्रिशला कदम ,जयकुमार कोले,प्रा. पुंडलीक रक्ताडे,प्रा.रमेश लवटे, प्रा.व्ही.आर.पालेकर आदी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.आणि त्यातून समाजवादी प्रबोधिनीचे कार्य अधिक सक्षमतेने विकसित करण्याची ग्वाही दिली. 

यावेळी प्रा. डॉ. जे.एफ.पाटील ,प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, शशांक बावचकर,राहुल खंजिरे, प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, जयकुमार कोले ,प्रा.डॉ. संजय साठे, प्रा.पुंडलीक रक्ताडे यांना विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि आणि विविधपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या सभेमध्ये वरील सर्व मान्यवरांसह प्रा.शिवाजीराव होडगे,कॉ.मुकुंद वैद्य, रवींद्र जाधव, के.एम. पाटील डी.एस.घोडे ,भारत वराळे ,आनंद हावळ, शिवाजी दुर्गाडे, सौदामिनी कुलकर्णी,प्रा.संगीता पाटील,नंदा हालभावी,अश्विनी कोळी,अन्वर पटेल,पांडुरंग पिसे,दयानंद लिपारे,नौशाद शेडबाळे,शिवाजी शिंदे,मनोहर जोशी,अशोक माने,महालिंग कोळेकर,तुकाराम अपराध ,आनंद जाधव  यांच्यासह  विविध शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते.प्राचार्य डॉ.सुनील हेळकर यांनी आभार मानले.


फोटो : समाजवादी प्रबोधिनीच्या ४४ व्या वार्षीक सभेत बोलताना प्रा.डॉ.जे.एफ.पाटील मंचावर प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील आणि प्रसाद कुलकर्णी

Post a Comment

Previous Post Next Post