इचलकरंजीत चांदणी चौक आरसीएच केंद्रास लायन्स क्लब तर्फे सिरीजचा पुरवठा



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

सिरीजच्या तुटवड्यामुळे कोरोना लसीकरण रखडण्याची शक्यता असलेल्या इचलकरंजी शहरातील चांदणी चौक येथील आरसीएच केंद्रास लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने तातडीने सिरीज उपलब्ध करून देण्यात आले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सर्वत्र लसीकरण मोहिम राबविली जात आहे. त्यानुसार इचलकरंजी शहरामध्येही विविध भागात असलेल्या आरसीएच केंद्रामधून कोरोना लस दिली जात आहे. चांदणी चौक येथील आरसीएच केंद्रामध्ये लसीकरणा दरम्यान सिरीजचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे लसीकरण खोळंबण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे काहींनी लायन्स क्लबकडे यासंबधी मागणी केली.

तेेव्हा लायन्स क्लबचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भट्टड, सेक्रेटरी शैलेंद्र जैन, ट्रेझरर महेंद्र बालर, जॉइंट सेक्रेटरी संगीता सारडा,कनक भट्टड व विजय राठी त्याचबरोबर अन्य लायन्स पदाधिकार्‍यांनी याची तातडीने दखल घेत एक हजारांहून अधिक सिरीज तातडीने चांदणी चौक येथील आरसीएच केंद्रास उपलब्ध करून डॉ. सॅमसन घाडगे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी ,आरसीएच केंद्राचे अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान ,या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post