इचलकरंजीत स्वरतरंग संगीत अकँडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरात स्वरतरंग संगीत अकँडमीच्या वतीने मुंबईच्या गंधर्व संगीत महाविद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम इचलकरंजी नगरपालिका शिक्षण समितीचे माजी सभापती व विद्यमान नगरसेवक राजू बोंद्रे ,माजी प्राचार्य रामचंद्र निमणकर ,अकँडमीचे संस्थापक अध्यक्ष श्रीपती कोरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

इचलकरंजी शहरातील स्वरतरंग संगीत अकँडमीच्या माध्यमातून नवोदित गायकांना शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देत त्यांना गायन कला सादर करण्याची विविध माध्यमातून संधी उपलब्ध करुन दिली जाते.त्यामुळे या अकँडमीच्या माध्यमातून अनेक चांगले गायक कलाकार घडत असून ते इचलकरंजी शहराच्या लौकिकात भर घालण्यासाठी योगदान देत आहेत. नुकताच मुंबईतील गंधर्व संगीत महाविद्यालयाच्या वतीने गायन परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेत स्वरतरंग संगीत अकँडमीचा सलग दुसऱ्या वर्षी

१०० टक्के निकाल लागला असून यामध्ये इचलकरंजी केंद्रातून या अकँडमीची विद्यार्थीनी कु.हर्षदा सुतार हिने प्रथम क्रमांक पटकावला.तर विशेष श्रेणीत सात विद्यार्थी व प्रथम श्रेणीतही अन्य विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.त्यामुळे स्वरतरंग संगीत अकँडमीच्या वतीने परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार इचलकरंजी नगरपालिका शिक्षण समितीचे माजी सभापती व विद्यमान नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी त्यांनी स्वरतरंग संगीत अकँडमीच्या कलाक्षेत्रात चांगले गायक कलाकार घडवण्याच्या कार्याचे कौतुक केले.तसेच या अकँडमीचे कलाकार भविष्यात आपल्या उत्कृष्ट गायन कलेच्या सादरीकरणातून चांगले यश संपादन करत इचलकरंजी शहराबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याच्या नांवलौकिकात मोठी भर घालतील ,असा विश्वास व्यक्त केला.तसेच संगीत परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या यशासाठी अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष श्रीपती कोरे ,खजिनदार डॉ.सौ. शुभांगी कोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली  संगीत शिक्षक नरेंद्र सूर्यवंशी आणि नवनाथ सूर्यवंशी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे चीज झाल्याचे गौरवोद्गार काढले.यावेळी स्वरतरंग संगीत अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष श्रीपती कोरे ,खजिनदार डॉ. सौ.शुभांगी कोरे ,उपाध्यक्ष निखिल भंडारे ,संचालक वैभव माळी , रवींद्र झोले, अरुण केटकाळे ,भक्ती माळी - कोरे ,,आर बी व्यास, सॅम संजापुरे  यांच्यासह इतर संगीत प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

दरम्यान ,या वेळीअकँडमीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्रीपती कोरे वसौ.भक्ती माळी - कोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या वाढदिवसा निमित्त अॅकॅडमीतील कलाकारांनी कराओके सिस्टिमवर उत्कृष्ट गायन कला सादर करुन कार्यक्रमास आणखीनच रंगत आणली .

Post a Comment

Previous Post Next Post