प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील सेवासदन हेल्थ प्लस आणि ओंकारेश्वर एज्युकेशन ट्रस्ट ,लॉर्ड जिव्हेश्वर इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास शहर व परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात सुमारे १६० महिलांनी
तपासणी करून घेतली.
महिलांना दररोजच्या घरकामाच्या दगदगीत स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसा वेळ देणे जमत नाही. त्यामुळे त्यांची वेळेत आरोग्य तपासणी करुन आवश्यकतेनुसार औषधोपचार करणे खूप गरजेचे आहे. हीच जाणीव ठेवून केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सेवासदन हेल्थ प्लस आणि ओंकारेश्वर एज्युकेशन ट्रस्ट ,लॉर्ड जिव्हेश्वर इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सेवासदन हेल्थ प्लसच्या स्त्री-रोग विभागाचे डॉ. विजय बेनाडीकर यांनी महिलांची आरोग्य तपासणी करून मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिरात गरोदर महिलांसाठी विशेष पँकेज आणि आवश्यक त्या शस्त्रक्रिया कमीत कमी खर्चात करण्याची घोषणा डॉ. बेनाडीकर यांनी केली. महिलांना अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन या शिबिरात मिळाल्याने उपस्थित महिलांनी सेवासदन हेल्थ प्लसच्या टीमचे विशेष आभार मानले.या शिबिरात सुमारे १६० महिलांनी तपासणी करून घेतली.
सदर आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी सेवासदन हेल्थ प्लस इचलकरंजीचे सीईओ श्रीनिवास कल्पली , हॉस्पिटल प्रतिनिधी मुकेश कांबळे, मार्केटिंग हेड प्रशांत शेलार ,डॉ. बन्ने, डॉ. सोनल यांच्यासह एचआर हेड सॅमसन मोहिते आणि लॉर्ड जिवेश्वर इंग्लिश स्कूलच्या वृषाली साळी यांचे विशेष सहकार्य लाभले.