आ. प्रकाश आण्णा आवाडे यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नागरी बँक व पतसंस्था गटातून उमेदवारी निश्चित.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी : आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नागरी बँक व पतसंस्था गटातून उमेदवारी निश्चित.ल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नागरी बँक व पतसंस्था गटातून *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* हे निवडणूक लढवत आहे. सर्व सत्ताधारी गटातील नेत्यांशी चर्चा व विचार विनिमय करून त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. 

महाराष्ट्रातील नावाजलेली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचा चेअरमन म्हणून आमदार प्रकाशआण्णा हे आवाडे कार्यरत आहेत, सहकारातील ज्येष्ठ नेते *माजी खासदार सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा* यांचे आशीर्वाद व त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशआण्णा काम करीत आहे. सहकारी चळवळीसाठी उत्तम पद्धतीने संस्था किंवा बँक कशी व कोणत्या पद्धतीने चालवली पाहिजे हे त्यांना सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादांकडून शिकायला मिळाले.

१९८७ ते १९९० मध्ये शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्री मंडळामध्ये आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांना सहकार राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे त्या काळात सहकार त्यांनी खूप जवळून पाहिला आहे. महाराष्ट्र राज्यसहकारी बँकेचा शासननियुक्त संचालक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातून राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्य करण्याची त्यांना संधी मिळाली तसेच त्यांच्या सहकारातील अनुभवातून आजवर ज्या पद्धतीने व ज्या गतीने काम केलेले आहे, त्याच पद्धतीने किंबहुना जास्त गतीने ते सर्वांना सोबत घेऊन कार्यरत राहतील. नागरी बँक व पतसंस्था गटातून अर्ज दाखल केला आहे व त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे...

Post a Comment

Previous Post Next Post