प्रेस मीडिया वृत्तसेवा :.
इचलकरंजी शहरातील डीकेटीई ही संस्था अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. यंदा झालेली टीसीएस टेस्ट ही भारतात सर्वत्र एकाच दिवशी घेतली गेली आणि फायनल इंटरव्हयूमधून डीकेटीई संस्थेच्या १०३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सध्या नोकरीच्या क्षेत्रात आय.टी. कंपन्यांचा दबदबा असल्याकारणाने हे यश मोठे मानले जात आहे.
टीसीएस ही माहिती तंत्रज्ञान सेवा आणि आउटसोर्सीग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करणारी भारतातील एक अग्रगण्य सॉफ्टवेअर निर्मितीची कंपनी असून जगभरात एकूण ४६ देशांमध्ये १४९ कार्पोरेट ऑफीसेस आहेत.डीकेटीई संस्थेमध्ये इंटरव्हयूच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये खास प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. तसेच विद्यार्थ्यांच्या तयारीकडे विशेष लक्ष दिले जाते.त्यामुळे सुरुवातीला असलेल्या अॅप्टीट्यूट टेस्टमध्ये या तयारीचा खूप उपयोग होवून १०३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलीे. यामध्ये कॉम्प्युटर विभागामधून ३० , मेकॅनिकल विभागामधून २० , ईटीसी विभागामधून १६ , इलेक्ट्रॉनिक्स विभागामधून २७ , इलेक्ट्रीकल विभागामधून ९ व सिव्हील विभागामधून १ असे एकूण १०३ विद्यार्थ्यांची निवड झाेली आहे. या प्लेसमेंटसाठी संस्थेचे इंजिनिअरींग विभागाचे टीपीओ जी.एस. जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे , सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.सदर विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, डे.डायरेक्टर डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ.व्ही.आर. नाईक, डॉ.डी.व्ही. कोदवडे, डॉ.एस.ए. पाटील, डॉ आर.एन.पाटील, डॉ एम.बी.चौगुले व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.