संजय गांधी निराधार योजनां सह अन्य योजनांचे थकीत अनुदान जमा : राहुल खंजिरे

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ योजनेचे शासनाकडून मिळणारे अनुदान थकीत होते.  या योजनांचे एकूण २ कोटी ७९ लाख ८८ हजार ५०० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे इचलकरंजी शहराध्यक्ष राहुल खंजिरे यांनी दिली. 

संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ योजनेचे शासनाकडून मिळणारे अनुदान थकीत होते.त्यामुळे थकीत अनुदान तात्काळ लाभार्थ्यांना मिळावे ,यासाठी संजय गांधी निराधार योजनेचे शहराध्यक्ष राहुल खंजिरे यांनी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.या पाठपुराव्याला यश येवून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ योजना या दोन्ही

योजनांचे एकूण २ कोटी ७९ लाख ८८ हजार ५०० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे.

यामध्ये संजय गांधी निराधार योजना ऑगस्ट महिना ते  ऑक्टोबर महिनाअखेर रु.१ कोटी ८४ लाख ३१ हजार ५०० रुपये आणि श्रावण बाळ सेवा योजना गट ब ऑक्टोबर महिना अखेर  ७३ लाख ५७ हजार रुपये ,श्रावण बाळ सेवा योजना गट ब  जानेवारी महिना ते नोव्हेंबर महिना अखेर २२ लाख रुपये इतके अनुदान जमा झालेे आहे.   

या कामी  प्रांताधिकारी  डॉ. विकास खरात व अप्पर तहसीलदार शरद पाटील यांचे सहकार्य लाभले.हे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले असून त्याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन इचलकरंजी ( शहर ) तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post