जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या सानिया शिंदेला सुवर्णपदक

 राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड ; सर्वस्तरातून अभिनंदन


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

कोल्हापूर येथे जिल्हा मुष्टियुद्ध संघटने मार्फत१७ वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा  घेण्यात आल्या. या स्पर्धेत इचलकरंजी शहरातील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची दहावीची विद्यार्थिनी कु. सानिया सचिन शिंदे हिने ४४ ते ४६ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले.त्यामुळे तिची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

इचलकरंजी शहरातील ना.बा.एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलने विद्यार्थीनींना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु ठेवला आहे. त्याचबरोबर विद्यार्थीनींना स्वतः मधील क्षमता सिद्ध करता याव्यात ,यासाठी विविध स्पर्धा परीक्षा आणि खेळाच्या प्रशिक्षणाला विशेष प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या हायस्कूलच्या विद्यार्थीनी विविध स्पर्धांबरोबरच खेळांमध्ये विशेष कामगिरी करत यशाचे मानकरी ठरत आहेत. नुकताच कोल्हापूर येथे जिल्हा मुष्टियुद्ध संघटनेमार्फत

१७ वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा  घेण्यात आल्या. या स्पर्धेत .या हायस्कूलची दहावीची विद्यार्थिनी कु. सानिया सचिन शिंदे हिने४४ ते ४६ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले.त्यामुळे तिची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशाबद्दल तिचे श्री ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा , चेअरमन हरीष बोहरा , व्हाईस चेअरमन उदय लोखंडे , ट्रेझझर राजगोपाल डाळ्या, सेक्रेटरी  बाबासाहेब वडींगे ,स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर  या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

तसेच श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस.गोंदकर , उपप्राचार्य आर.एस.पाटील, उपमुख्याध्यापिका सौ.एस.एस. भस्मे व पर्यवेक्षक व्ही.एन.कांबळे यांनी देखील तिचे अभिनंदन केले.या विद्यार्थीनीस हायस्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख शेखर शहा ,  सागर चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post