प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील गावभागमधील श्री कालिका देवालय ट्रस्ट व मिरजेतील लायन्स नँब नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै.रायाप्पा सुतार यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व शासकीय योजनेतून अल्पखर्चात शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार १९ डिसेंबर रोजी गावभाग परिसरातील नरसोबा कट्टाजवळील श्री कालिका देवालय याठिकाणी होणार असून याचा गरजूंनी लाभ घ्यावा ,असे आवाहन श्री कालिका देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन सुतार यांनी दिली.
इचलकरंजी शहरातील विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाची शिखर संस्था म्हणून श्री कालिका देवालय ट्रस्टची मोठी ओळख आहे. या ट्रस्टच्या पुढाकाराने विश्वकालिका ग्लोबल फौंडेशन व विश्वकालिका महिला मंडळ यांच्या सहकार्याने पांचाळ सुतार समाज बांधवांना संघटीत करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. या शिवाय वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि त्याला सामाजिक उपक्रमाची जोड दिली जाते. या ट्रस्टच्या माध्यमातून कोरोना महामारी व महापुराच्या काळात गरजूंना जेवणाबरोबरच गरजोपयोगी साहित्य वाटप ,समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यावर विशेष भर दिला आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री कालिका ट्रस्ट व मिरजेतील लायन्स नँब नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विश्वकालिका ग्लोबल फौंडेशन ,विश्वकालिका महिला मंडळ यांच्या सहकार्यानेकै.रायाप्पा सुतार यांच्या स्मरणार्थ गावभागातील नरसोबा कट्टा जवळील श्री कालिका देवालय या ठिकाणी रविवार १९ डिसेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी व शासकीय योजनेतून अल्प खर्चात शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आली आहे.
तरी या शिबीराचा गरजूंनी लाभ घ्यावा ,असे आवाहन श्री कालिका देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन सुतार यांनी केले आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त प्रकाश सुतार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.