मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील हटकर कोष्टी समाज युवक मंडळ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी अमित खानाज यांची तर उपाध्यक्षपदी हेमंत वरुटे यांची निवड करण्यात आली.
इचलकरंजी शहरातील हटकर कोष्टी समाजाचे अध्यक्ष शिवकांत मेत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुकाणू समिती व समाजाच्या बैठकीत कार्यकारिणीच्या निवडी पार पडल्या. नव्या निवडीचे समाजातील मान्यवरांकडून व युवा वर्गातून स्वागत झाले. अन्य पदाधिकाऱ्यां मध्ये खजिनदारपदी ऋषिकेश हळदे यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी दीपक वस्त्रे यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारिणीमध्ये विजय गदाळे, विवेक दसरे, वासुदेव आदर्शे, महेश मनवाडी, किसन अक्केतंगेरहाळ, चैतन्य नेजे, विजय कडगावे, आनंद हेब्बाळ, श्रीशैल जेऊर यांचा समावेश आहे. नूतन पदाधिकारी यांचा सत्कार समाजाचे अध्यक्ष शिवकांत मेत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नूतन अध्यक्ष अमित खानाज यांनी समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांना सोबत घेऊन जाणार असून नजीकच्या काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी सुरेश पाडळे, गणेश कोल्हापूरे, वसंत महिंद, महादेव खानाज, बाळासाहेब मनवाडी, प्रशांत गलगले, चिंतामणी पारिशवाड, रजनीकांत लठ्ठे, विवेक हासबे यांच्यासह युवक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.