इचलकरंजीत पांचाळ सुतार समाजाने जपली सामाजिक बांधिलकी

 



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पांचाळ सुतार समाजाने विधायक उपक्रम राबवत पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.या समाजाच्या श्री कालिका देवालय ट्रस्ट ,विश्वकालिका ग्लोबल फौंडेशन व विश्वकालिका महिला मंडळाच्या वतीने कै.रायाप्पा सुतार यांच्या स्मरणार्थ रविवारी आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबीरास समाजबांधवांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या उपक्रमासाठी मिरजेतील लायन्स नँब नेत्र रुग्णालय व उदगांवच्या आचार्य श्री.तुलसी ब्लड बँकेचे मोठे सहकार्य लाभले.

इचलकरंजी शहरातील विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाच्या श्री कालिका देवालय ट्रस्टच्या पुढाकाराने आणि विश्वकालिका ग्लोबल फौंडेशन व विश्वकालिका महिला मंडळ यांच्या सहकार्याने दरवर्षी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच आरोग्य तपासणी शिबीर ,नैसर्गिक व मानवनिर्मित संकटकाळात गरजूंना गरजोपयोगी साहित्य वाटप ,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यासह विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री कालिका ट्रस्ट व मिरजेतील लायन्स नँब नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विश्वकालिका ग्लोबल फौंडेशन ,विश्वकालिका महिला मंडळ यांच्या सहकार्याने कै.रायाप्पा सुतार यांच्या स्मरणार्थ गावभागातील नरसोबा कट्टा जवळील श्री कालिका देवालय येथे आज रविवारी मोफत नेत्र तपासणी व शासकीय योजनेतून अल्प खर्चात शस्त्रक्रिया आणि आचार्य श्री तुलसी ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचा शुभारंभ पांचाळ सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष व ओबीसी समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी , प्रसिद्ध उद्योजक जयवंत सुतार ,लायन्स क्लब आँफ कोल्हापूर वेस्टचे अध्यक्ष श्री.हजारे ,कालिका देवालय ट्रस्टचे संस्थापक संजय सुतार ,श्री.चोडणकर ,श्री.बेलेकर ,लायन्स नँब नेत्र रुग्णालयाचे विश्वस्त नंदकुमार सुतार ,विश्वकर्मा सुतार - लोहार समाजाचे सचिन सुतार ,कालिका देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन सुतार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्री कालिका देवीच्या मूर्तीचे

व कै.रायाप्पा सुतार यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आला.यावेळी वैद्यकीय पथकाकडून शिबीरात सहभागी झालेल्या गरजू नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.यावेळी काही गरजू रुग्णांची शासकीय योजनेतून सवलतीमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली.तसेच अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.त्यामुळे मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबीरास पांचाळ सुतार समाजबांधवांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबीरासाठी लायन्स नँब नेत्र रुग्णालयाच्या डॉ. दिव्या पाठक ,स्त्री रोग तज्ञ डॉ. अभिजीत सुतार ,आचार्य तुलसी ब्लड बँकेचे श्री.शिरोटे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी ,कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले.

या वेळी कालिका देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन सुतार ,विश्वस्त प्रकाश सुतार ,लिंगायत समाजाचे सेक्रेटरी किशोर पाटील ,सूरज बेलेकर ,समीर जमादार ,सुनील लंगोटे ,बसवराज टक्कळगी ,दीपक सुतार ,दत्तात्रय सुतार ,किरण सुतार यांच्यासह पांचाळ सुतार समाजातील महिला ,पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post