प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरांजी : प्रतिनिधी :
श्रावस्ती बहु उद्देशीय सेवा संस्था ( कबनूर )यांच्या वतीने घोरपडे नाट्यगृहात नुकताच संविधान प्रचार व प्रसार आणि महिला सन्मान असा संयुक्त कार्यक्रम महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्था ( कबनूर )यांच्यावतीने समाजातील विविध घटकातील महिलांच्या सामाजिक ,आर्थिक विकासासाठी विविध माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात. याच अनुषंगाने संविधान प्रचार व प्रसार तसेच एकल महिलांच्या शैक्षणिक साहित्य मदतीसाठी नुकताच इचलकरंजीत घोरपडे नाट्यगृहात संविधान प्रचार व प्रसार आणि महिला सन्मान असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते तसेच माजी खासदार श्रीमती निवेदिता माने ,राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना श्रावस्ती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी रुपाली चाकणकर यांनी आपल्या मनोगतात श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी होत असलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.यावेळी विविध मान्यवरांनी देखील महिलांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव करुन समस्त महिलांच्या पाठिशी समाज उभा राहिला तरच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास पंचगंगा साखर कारखाना संचालक प्रमोद पाटील, सुनीता पोळ, श्रीकांत लोंढे,अभय चौगुले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला उपक्रमशील शिक्षक सुनील स्वामी व राष्ट्र सेवा दलाने संविधान पोवाडा व अभंग सादर केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे सचिव राहुल वराळे तर संस्थेची माहिती अध्यक्षा भक्ती शिंदे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय काळे यांनी केले.या कार्यक्रमास महिलांची मोठी उपस्थिती होती.