प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील नामांकित डीकेटीई काँलेजच्या टेक्स्टाईल विभागातील १२ विद्यार्थ्यांची देशातील नामवंत वेलस्पन कंपनीमध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. वेलस्पन इंडिया, वापी येथे डीकेटीईचे निवड झालेले विद्यार्थी विविध पदांवर रुजू झाले आहेत.
वेलस्पन कंपनी टेरीटॉवेल उत्पादनात देशभरात अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. आशियातील टेरीटॉवेलचे उत्पादन घेणारी ही दुस-या क्रमांकावरील सगळयात मोठी कंपनी आहे. जगभरातील एकूण ५० देशामध्ये या कंपनीच्या टेरीटॉवेल उत्पादनाचे निर्यात होते. वेलस्पन कंपनीच्या स्थापनेपासून प्रत्येकवर्षी ही कंपनी डीकेटीईतील विद्यार्थ्यांच्या कॅम्पस निवडीसाठी भेट देत असते. याही वर्षी या कंपनीमार्फत आयोजित रिटन टेस्ट, पर्सनल इंटरव्हयू अशा अनेक फे-यामधून विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमताची चाचणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांचे एकूणच शैक्षणिक गुणवत्ता यावरुन त्यांची उत्तम पॅकेजसह निवड केली.
वेलस्पन कंपनीमध्ये निवड झालेल्या डीकेटीई टेक्स्टाईलच्या विद्यार्थ्यांमध्ये मोहीत बन्सल, प्रमोद सुर्यवंशी, सायराबानू मुल्ला, दिव्या कोन्नूर, अजय लांडे, ॠषीकेश तारळेकर, दिशा टंकसाळे, पूर्वा जिजूनागे, नम्रता प्रभू, श्रावणी चिमटे, ज्ञानेश्वरी कुंभार, नवनाथ चौगुले यांचा समावेश आहे.
लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये देखील विद्यार्थ्यांचे १०० टक्के क्वॉलिटी प्लेसमेंट व्हावे यासाठी डीकेटीई मार्फत ऑनलाईन इंटरव्हयूचे आयोजन करण्यात येते. डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे सॉफ्टस्कील प्रोग्रामस, देण्यात येणारे इंडस्ट्रीयल प्रशिक्षण, इंडस्ट्री भेटी, गेस्ट लेक्चर्स या सर्वांचा फायदा या विद्यार्थ्यांना होत असतो. या सर्वामध्ये डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागाचे टीपीओ प्रो.एस.बी. अकीवाटे यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांना डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डे. डायरेक्टर डॉ.यु.जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.