प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी नगरपालिकेने शहरातील नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता संयुक्त करामध्ये पुर्नमूल्यांकनच्या नोटिसा बजावल्या आहेत.त्यामुळे अन्यायी दहा टक्केकरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने पालिकेच्या प्रवेशदारात तीव्र निदर्शने करण्यात आली.तसेच सदरची करवाढ मागे घ्यावी ,या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना देण्यात आले.
इचलकरंजी नगरपालिकेने शहरातील मालमत्ताधारकांना घरफाळा करामध्ये दहा टक्के वाढ केली आहे. तसेच याबाबतच्या नोटिसा सर्व मालमत्ताधारकांना बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधीच कोरोना महामारी ,लाँकडाऊन आणि महापुराच्या संकटामुळे सर्व उद्योग - व्यवसायावर मोठा गंभीर परिणाम झाला आहे.यातून सर्वसामान्य जनतेला विविध आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात पालिकेने शहरातील मालमत्ताधारकांना दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेवून अन्याय केल्याने जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.याच अनुषंगाने अन्यायी दहा टक्के करवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने पालिकेच्या प्रवेशदारात तीव्र निदर्शने करण्यात आली.तसेच सदरची करवाढ मागे घ्यावी ,या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे शिष्टमंडळ व मुख्याधिकारी यांच्यामध्ये झालेल्या चर्चे दरम्यान सर्वसामान्य जनतेची सध्याची वास्तव परिस्थिती शासन दरबारी मांडून लवकरात लवकर ही अन्यायी करवाढ मागे घ्यावी अन्यथा पालिकेच्या विरोधात जनआंदोलन उभारू असा इशाराही शिवसेना जिल्हा उपप्रमुख महादेव गौड व शहरप्रमुख सयाजी
चव्हाण यांनी दिला.या निदर्शनामध्ये माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे,माजी शहरप्रमुख धनाजी मोरे,युवासेना जिल्हाधिकारी शिवाजी पाटील,उपशहरप्रमुख दत्ता साळुंखे,मनोज भाट, संतोष गौड,गणेश जंगटे, दिलीप शिंदे,विजय देवकर,अजय घाडगे,बसय्या स्वामी,संजय पाटील,लक्ष्मण पाटील,मधूमती खराडे,सविता सपाटे ,शोभा गोरे यांच्यासह शिवसेनेचे आजी - माजी पदाधिकारी ,शिवसैनिक उपस्थित होते.