प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी ही कष्टकऱ्यांची नगरी...या नगरीत कष्टकरी वर्गातील मुले शिकून शहाणी व्हावीत ,त्यांच्या कार्यातून समाज विकासात योगदान मिळावे ,यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत... तशाच सामाजिक भान जपणा-या व्यक्ती देखील विविध माध्यमातून धडपड करीत आहेत... समाज मनात सुख पेरण्याच्या या धडपडीच्या कार्यामध्ये आदरणीय राजेंद्र घोडके या उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय शिक्षकांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल...
एक हाडाचा शिक्षक ते समाजशिक्षक याचे दर्शन त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील व्रतस्थ कार्यातून दिसून येते...त्यांच्या कार्याचे स्वरुप उलगडून बघणं ,हा देखील एक मोठा संशोधनाचा विषय ठरेल ,इतकी त्यातील व्यापकता ,सखोलता ,परिणामकता अधोरेखित करणारी आहे...मुले ही देवाघरची फुले असे मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निरपेक्ष भावनेनं झटत राहणं ,यातला निखळ आनंद काय असतो ,हे घोडके सरांच्या कार्यातून कळून येते...
सरकारी शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा याबद्दल नेहमीच उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत असते...पण ,सरकारी शाळांबद्दलचा पालकांचा व एकूणच समाजाचा चुकीचा समज दूर करण्यात राजेंद्र घोडके सरांनी विविध माध्यमातून केलेले सकारात्मक प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरले आहेत... म्हणून ,तर आजघडीला पालिकेच्या गुरुदेव रविंद्रनाथ टागोर विद्या मंदिरचा नावलौकिक वाढवण्यात ते आपल्या सहका-यांच्या मदतीने कमालीचे यशस्वी ठरले आहेत... कोणत्याही गोष्टींबाबत सर्वांगाने सखोल अभ्यास करायचा ,तज्ञांचे मार्गदर्शन घ्यायचे आणि सहका-यांच्या एकमताने काम करायचे ,हे त्यांच्या यशाचे गमक म्हणता येईल... शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तका पलिकडे जावून विविध गोष्टींचे कुतूहल समजून घेणे ,संशोधन करणे ,आपल्यातील बौद्धिक व शारीरिक क्षमता ओळखणे व त्याच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे धडे देवून उपक्रमशील शिक्षकाचा आदर्श वस्तूपाठ समाजासमोर घालून दिला आहे...प्राचीन भारतीय संस्कृती व आधुनिकता यांचा योग्य मेळ साधत त्यातून आजची भावी पिढी उद्याचा सक्षम नागरिक घडावा ,ते नव्या आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी आत्मनिर्भर बनावेत ,सुसंस्कारित बनावेत ,यासाठी राजेंद्र घोडके सरांनी अगदी व्रतस्थपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरु ठेवून तेच कार्य आता शिक्षणक्षेत्रात नवे माँडेल म्हणून मान्यता पावू लागले आहे...अगदी सर्वसामान्य कुटूंबातील मुले - मुली शाळेच्या दैनंदिन अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षेत चमकून स्वतःचे वेगळेपण सिध्द करत आहेत... या सा-याचे श्रेय राजेंद्र घोडके सर व त्यांच्या सहका-यांच्या प्रामाणिक धडपडीलाच द्यावे लागेल... मुलांना वैयक्तिक अभ्यासाचे मार्गदर्शन , शैक्षणिक साहित्यासाठी मदत आणि त्यांच्या बौध्दिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांचे सुरु असलेले प्रामाणिक प्रयत्न हेच खरंतर शिक्षणाच्या सार्वत्रिकी करणा बरोबरच विचारांच्या परिवर्तनाच्या कार्याला मोठे बळ देणारे आहे... या
सा-यातून ,उधळू फुले प्रकाशाची...अंधाराच्या वाटेवरी अशा निरपेक्ष ध्येयवेड्या कार्याची प्रचिती आल्याखेरीज रहात नाही... त्यामुळेच शैक्षणिक ,सामाजिक कार्यात झोकून देत वेगळेपण सिद्ध करणाऱ्या राजेंद्र घोडके या शिक्षकांबद्दल सर्वांच्या मनात कमालीचा आदर आहे...म्हणूनच तर निकोप समाजनिर्मितीसाठी झटणाऱ्या या गुरुवर्यांना असेच चांगले यश ,सुख आणि उदंड आयुष्य लाभो ,याच त्यांना आजच्या वाढदिवसाच्या उदंड व मनस्वी शुभेच्छा...!