घरफाळा करा मध्ये दहा टक्के वाढ न करण्याची मनसेची मागणी

घरफाळ्यात वाढ झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

शासन स्तरावरुन इचलकरंजी नगरपालिकेला शहरातील मालमत्ताधारकांच्या घरफाळा करामध्ये १० टक्के वाढ करावी, अशा सूचना मिळाल्याचे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतू ,कोरोना महामारी व महापूर आदी गंभीर परिस्थितीचा विचार करून घरफाळा करा मध्ये शासनाने वाढ करू नये, अशा मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रांत कार्यालयात देण्यात आले. नायब तहसीलदार संजय काटकर यांनी सदरचे निवेदन स्वीकारले.

इचलकरंजी शहरात कोरोना महामारी व महापुराचा मोठा फटका बसून अनेक उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडले आहेत.परिणामी अनेकांचा रोजगार बुडाला आहे. या परिस्थितीतून आता कुठे नागरिक सावरत असतानाच व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असतानाच नगरपालिकेने नागरिकांतून येणाऱ्या हरकतींची वाट न पाहता घरफाळ्यात १० टक्के वाढ केली आहे. ही वाढ अन्यायकारक असून ती होवू नये असे सदर निवेदनात नमूद केले आहे. यावेळी घरफाळ्यात वाढ झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला. 

यावेळी मनसेचे रवी गोंदकर, शहराध्यक्ष प्रताप पाटील, शहाजी भोसले, मनोहर जोशी, मोहन मालवणकर, संजय भंडारे, विनायक मुसळे, राजेंद्र निकम, महेश शेंडे, सिंधुताई शिंदे, सुलोचना घाटगे,अनिल झाडबुके, लता माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post