प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे राष्ट्रवादीच्या वतीने देशाचे नेते ,खासदार शरदचंद्र पवार यांचा ८१ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
इचलकरंजी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने देशाचे नेते ,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये गुरु कन्नननगर येथे समाधान वृद्धाश्रमात वयस्कर मंडळींना धान्य वाटप करण्यात आले. त्याचबरोबर सर्व नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करुन मोफत चष्मे वाटप आणि गरजू रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली.
तसेच कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची सोय करण्यात आली होती.या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दरम्यान ,शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य ,नगरसेवक मदन कारंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रकाश पाटील , बांधकाम सभापती उदयसिंग पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी नगरसेवक मंगेश कांबूरे , सेवादल शहराध्यक्ष नागेश शेजाळे,राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्षा सातपुते वहिनी, अण्णासाहेब कागले, सामाजिक कार्यकर्ते संजय बेडक्याळे , सामाजिक कार्यकर्ते नितीन कोकणे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सलीम ढालाईत, सादिक जमादार, दीपक नेर्लेकर, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष निखिल जमाले, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अभिजीत रवंदे, कार्याध्यक्ष विवेक चोपडे, युवराज जाधव, मच्छिंद्र नगारे, आनंद कांबळे, विकास मकोटे, अमित कांबळे,प्रशांत शेंदुरे,कृष्णात बडवे, सचिन टोने,युसुफ दुर्ग,अमित पाटील, तसेच इतर सेलचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.