प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
कबनूर येथील श्रावस्ती बहुद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने चंदूरच्या श्रीमती सारिका शंकरय्या पुजेरी यांना श्रावस्ती राज्यस्तरीय यशस्वी महिला उद्योजिका गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नुकताच घोरपडे नाट्यगृहात झालेल्या एका शानदार समारंभात त्यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते व माजी खासदार श्रीमती निवेदिता माने ,बालाजी उद्योग समूहाचे अध्यक्ष मदन कारंडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
कबनूर येथील श्रावस्ती बहुद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षी संविधान प्रचार व प्रसार अभियानांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. चंदूरमधील श्रीमती सारिका पुजारी यांनी बाजरीसह विविध धान्याच्या कडक भाकरी ,चटणी ,लोणची व पापड उत्पादन उद्योगातून अनेक बेरोजगार महिलांना
आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देत त्यांना स्वावलंबी करण्यात मोठे यश मिळवले आहे.यातून महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणाच्या कार्याला मोठे बळ मिळाले आहे. या उल्लेखनीय कार्याची श्रावस्ती बहुद्देशीय सेवा संस्थेने दखल घेवून त्यांची श्रावस्ती राज्यस्तरीय यशस्वी महिला उद्योजिका गौरव पुरस्कारासाठी निवड केली होती. नुकताच घोरपडे नाट्यगृहात झालेल्या एका शानदार समारंभात श्रीमती सारिका पुजेरी यांना श्रावस्ती राज्यस्तरीय यशस्वी महिला उद्योजिका गौरव
या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करुन सन्मानित करण्यात आले. या वेळी रुपाली चाकणकर यांच्यासह माजी खासदार श्रीमती निवेदिता माने ,बालाजी उद्योग समूहाचे अध्यक्ष मदन कारंडे यांच्यासह मान्यवरांनी आपल्या मनोगतात सारिका पुजेरी यांनी मोठ्या जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन उद्योग क्षेत्रात मिळवलेले यश हे समस्त महिला वर्गासह समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले.
या समारंभास पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील , श्रावस्ती संस्थेच्या अध्यक्षा भक्ती शिंदे ,सचिव राहुल वराळे ,सुनीता पोळ ,श्रीकांत लोंढे ,अभय चौगुले ,शिक्षक सुनील स्वामी ,विजय काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दरम्यान श्रावस्ती बहुद्देशीय सेवा संस्थेचा राज्यस्तरीय यशस्वी महिला उद्योजिका गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती सारिका पुजेरी यांचे चंदूर परिसरात विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.