इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने १४ डिसेंबर ' ऊर्जा संवर्धन दिन' साजरा



प्रेस मीडिया वृत्तसेवा :           

 इचलकरंजी :   महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार इचलकरंजी नगर परिषदेच्या माझी वसुंधरा २.० अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने आज दि.१४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन  दिना निमित्त शहरातील नागरिकांची जनजागृती व्हावी याकरिता प्रचलित इंधनाचा वापर कमी करणे, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि अपारंपारिक ऊर्जा स्तोत्रांचा वापर करुन *ई बाईक* वापरणेसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी नगरपरिषदे मार्फत नगरपरिषद प्रांगणात शहरातील ई बाईक विक्री व्यावसायिकांच्या सहकार्याने ई बाईक वेहीकल प्रदर्शन  कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमा साठी शहरातील ई बाईक व्यावसायिकांनी उस्पुर्त प्रतिसाद दिला. 

नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन उपस्थित ई बाईक वितरकांशी चर्चा करून बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदरात नगरपरिषद कर्मचाऱ्यां करिता ई बाईक साठी अर्थ पुरवठा करण्या साठी प्रयत्न करण्याचे तसेच शहरात आपल्या कडून चार्जिंग स्टेशन उभे करण्याचे आवाहन केले. (नगरपरिषदेचे वतीने शहरात तीन ठिकाणी मोफत चार्जिंग स्टेशन सुरू करणेत आलेली आहेत) तसेच शहरातील बहुसंख्य नागरिकांनी यापुढे ई बाईक तसेच पारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर करून प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा केले.विविध प्रकारच्या ई बाईक प्रदर्शनासाठीआल्याने उपस्थित नागरिकांनी या संबंधी आवश्यक माहिती जाणून घेतली. तसेच सर्व विक्री प्रतिनिधींनी ई बाईक खरेदीसाठी स्पॉट बुकिंगची  सुविधा उपलब्ध करून दिल्याने जवळपास ५ ई बाईकचे बुकिंग यावेळी झाले.

    याप्रसंगी कामगार अधिकारी विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, नगर अभियंता भागवत सांगोलकर, सहा. नगररचनाकार रणजित कोरे, कार्यालय अधिक्षक प्रियंका बनसोडे , शुभांगी जोशी,प्रविण बोंगाळे आदी उपस्थित होते. तसेच यश ऑटोमोबाईल, आशिर्वाद ई बाईक, इलेक्ट्रॉ मोटर्स, सुपर ई बाईक, रॉयल ई बाईक,साई मोटर्स, पाटील मोटर्स, सोलर टेक्नॉं लॉजीज या ई बाईकवितरकांनी सहभाग घेतला.

    सदर कार्यक्रमाच्या आयोजना साठी नगर अभियंता विद्युत संदीप जाधव आणि रचना सहाय्यक नितिन देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.



   

Post a Comment

Previous Post Next Post