प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
देहूरोड दि.५ उद्या सोमवारी ६ डिसेंबरला महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आयोजित शांती ज्योत रॅलीत देहूरोड, देहूरोड परिसरातील सर्व नागरिक सर्व बुद्ध विहाराचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते तसेच सर्व बोद्ध उपासक,उपासिंकांनी आणि सर्व आंबेडकरी जनता व सर्व नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन धम्मभुमी देहूरोड आंबेडकरी जनता शांती ज्योत संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे . आयोजित शांती ज्योत रॅली ६ डिसेंबरला सायंकाळी ठिक ६ वा. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महा प्रवेशद्वार शिल्पा पासून प्रारंभ होऊन मुंबई पुणे महामार्गा वरून होटेल सवाना चौक,तेथुन अबुशेठ मार्गा वरून वृंदावन चौक ,छ.शिवाजी महाराज मार्गावरून म.ज्योतिबा फुले मंडई वरुन ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, स्वामी विवेकानंद चौकातुन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळ्याला पूष्पमाला अर्पण करून धम्मभुमी ऐतिहासिक बुद्ध विहारा शेजारी असलेल्या महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी स्तुपास अभिवादन व वंदना होऊन शांती ज्योत रॅलीची सांगता होईल.
*धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने धम्मभुमी देहूरोड आंबेडकरी जनता शांती ज्योत संयोजन समितीचे देहूरोड ,देहूरोड परिसरातील बौद्ध बांधव ,आंबेडकरी जनता सह सर्व नागरिकांना आवाहन*
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*