प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
देहूरोड दिनांक 24 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 25/ 12 /1954 रोजी स्वहस्ते बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापणा केलेल्या धम्म भुमी देहू रोड बुद्ध विहाराचा 67 वा वर्धापन दिन लाखो बुद्ध बांधव आंबेडकरी जनतेच्या वतीने साजरा होणार.
कोरोना प्रादुर्भाव मुळे गेली दोन वर्ष बौद्ध बांधवांना 25 डिसेंबर दिनी पवित्र बुद्धमूर्ती चे दर्शन घेता आले नाही. यंदा मुक्तपणे दर्शन घेता येणार असून लाखो बौद्ध बांधव व आंबेडकरी जनतेत उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे महाराष्ट्राच्या कोपऱ्यातुन विविध प्रदेशातून येणारे बौद्ध बांधव व आंबेडकरी जनतेला पवित्र बुद्ध मूर्तीची दर्शन घेता यावे यासाठी पिंपरी चिंचवड विभागाचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, उपायुक्त आनंद भोईटे, देहूरोड विभागाचे सहा आयुक्त संजय नाईक पाटील, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावसाहेब जाधव, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी उत्तम नियोजन केले असून चोख बंदोबस्त ठेवला आहे.