ह्यूमन राइट जस्टीस असोशियन च्या वतीने उस्मानाबाद परांडाचे प्रणेते इकबालभाई शेख यांचा देहुरोड जिल्हा संपर्क कार्यालयात सन्मान.

या पुरस्कार व सन्मानाने मी अत्यंत धन्य झालो..  इकबाल शेख



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख

देहुरोड दि. १३ पिंपरी-चिंचवडच्या महानगरीत माझ्या सारख्या ग्रामीण भागातल्या सामान्य कार्यकर्ताचा मानवता राज्य पुरस्काराने सन्मान झाला .व ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशनच्या वतीने देहूरोड धम्मभूमीत माझे आदरातिथ्य, स्वागत करून सन्मान केला त्यामुळे मी धन्य झालो आहे असे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मानवता कार्यासाठी ख्यातनाम असलेले प्रणेते इकबाल शेख यांनी सन्मानाला उत्तर देताना प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह्यूमन राईट्स जस्टिस असोसिएशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष इम्तियाज शेख होते. प्रारंभी इकबाल शेख यांच्या ह्यूमन राईट्स जस्टिस असोशियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर जिल्हाध्यक्ष इम्तियाज शेख, उपाध्यक्ष आमिर आत्तार, मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे, पुणे जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे, शहजाद मुलानी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकात जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे यांनी संस्थेने केलेल्या व करीत असलेल्या संघटनेच्या कार्याची संपूर्ण माहिती दिली. संघटनेचे मार्गदर्शक व ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांनी मानवता कार्याचे प्रणेते इकबालभाई शेख यांचा पिंपरी चिंचवड शहरात राज्य पुरस्काराने व देहूरोड धम्मभूमीत ह्यूमन राईट्स असोशियनच्या वतीने त्यांचा सन्मान व गौरव होत आहे असा मानवतेचे प्रणेतेचे मार्गदर्शन होण्यासाठी मानवता कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन कार्यशाळा होणे आवश्यक आहे अशी अपेक्षा व्यक्त करून इकबालभाई शेख ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन संघटनेत सहभागी झाल्यास संघटनेला संघटनात्मक बळ मिळेल व संघटनेच्या माध्यमातून सर्व सामान्यांना न्याय हक्क मिळवून देता येईल असे मत व्यक्त करून त्यांनी इकबाल शेख यांना भावी मानवता कार्यास शुभेच्छा दिल्या.

इकबाल भाई शेख सामान्यांना न्याय हक्क मिळवून देण्यात संपूर्ण राज्यात ख्यातनाम आहेत त्यांच्या मानवता कार्याची दखल घेऊन त्यांना उस्मानाबाद परांडा वरून निमंत्रित करून त्यांचा पिंपरी-चिंचवड शहरात राज्य पुरस्काराने गौरव झाला हे अभिमानाची गोष्ट आहे व ह्युमन राईट जस्टीस असोसिएशनच्या वतीने आज आपण देहूरोड जिल्हा कार्यालयात इकबालभाई शेख यांचा सन्मान करीत आहोत मानवतेचे कार्यासाठी मी इकबाल भाई यांना ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशन च्या संघटनेत सहभागी होण्याचे आव्हान केले आहे, ते संघटनेत सहभागी होतील अशी अपेक्षा व आवाहन करून तनवीर मुजावर यांनी इकबाल भाई शेख यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.


 *जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली  9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post