आजारास निमंत्रण देणारा रस्त्यावर पसरलेला कचरा.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
देहूरोड दि. ११, देहूरोड परिसरातील मुख्य बाजापेठे समोरील मुंबई पुणे रस्त्यावर कचरा पसरलेला नेहमीच पहायला मिळतो समोर रिक्षा आणि बस स्टॉप आहे प्रवासी उभे राहतात आणि त्याच ठिकाणी हे असे घाणीचे साम्राज्य,दुर्गंधी सतत पसरले असते
दुसरे नवीन बँक ऑफ इंडिया समोर BSNL बिल्डिंग च्या बाजूला ही देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील परिसरात अनेक ठिकाणी कचरा कुंडीच्या बाहेर पडलेला पाहायला मिळत आहे , त्या मुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या साफसफाई विभागाचे दुर्लक्ष , नागरिकानी हा त्रास किती व कधीपर्यंत सहन करायचा ? ,असा प्रश्न निर्माण झाला आहे, कोरोना, डेंग्यू,टायफॉइड, मलेरिया, सारख्या गंभीर आजाराशी आपण लढत असताना जर प्रशासनाचे असे हे दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्यासाठी घातक आहे. या बाबत आरोग्य खात्याने दुर्लक्ष न करता त्वरित कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे