पुणे सातारा महामार्गावर वेगाने जाणारी शिवशाही बसने पाठीमागून जोरदार धडकेत दुचाकीस्वार ठार

बस चालकावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 भोर :  पुणे सातारा महामार्गावर वेगाने जाणारी शिवशाही बसने पाठीमागून जोरदार धडकेत दुचाकीस्वार उपचारा दरम्यान ठार झाला आहे या प्रकरणी बस चालकावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विचित्र अपघातात दुचाकी ही शिवशाही बसच्याखाली अडकली होती.

दत्तात्रय सिताराम धाडवे रा. वय ३० सारोळा ( ता. भोर ) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून पुणे – सातारा महामार्गावर हॉटेल अमृता गार्डनसमोर ( ता. भोर ) हद्दीत दि. ७ रोजी मंगळवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

घटनास्थळी किकवी दूरक्षेत्राचे पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी शिवशाही बसचालक अमित ज्ञानेश्वर करंजीकर ( एसटी डेपो मेढा ) यांच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे अमलदार गणेश लडकत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा बाजूकडे जाणारी एम.एच. ०४/ जे. के./ १२६९ या शिवशाही बसने पाठीमागून दुचाकी हिरो होडा शाईन एम.एच. १२/ एल. बी./ ६५४९ हिस जोरदार धडक दिल्याने दत्तात्रय धाडवे अपघातात गंभीर जखमी झाले होते.

स्थानिक तरुणांनी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तुषार रामचंद्र धाडवे रा. सारोळा ( ता. भोर ) यांनी याबाबत यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस नाईक गणेश लडकत करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post