या प्रकरणी महिला पौड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करणार
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : वॉशरुमला जाण्यासाठी पत्र लिहून घेणाऱ्या प्रभा कंपनीच्या मॅनेजरला मनसे स्टाईल दणका देण्यात आला आहे. मनसे माथाडील कामगारांनी या मॅनेजरच्या कानशिलात लगावत त्याला या प्रकरणी जाब विचारला आहे. तसेच, या प्रकरणी महिला पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे..?
पुण्यातील प्रभा इंजिनिअरिंग कंपनीत महिला कामगारांना मानसिक त्रास दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. येथे वॉशरुमला जाणाऱ्या महिलांकडून पत्र लिहून घेतलं जात असल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. हा गलिच्छ प्रकार घडवून आणणाऱ्या कंपनी मॅनेजरचा प्रताप कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांनी उघडकीस आणला.
महिला कंपनी मॅनेजरचा हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर महिलांना कंपनीत गलिच्छ वागणूक देणाऱ्या या कंपनी मॅनेजरला मनसे माथाडी कामगारांनी मनसे स्टाईलने जाब विचारला. मॅनेजरच्या केबिनमध्ये बसून या कामगारांनी त्याला जाब विचारला. कोण वॉशरुमला जाणाऱ्यांकडून पत्र लिहून घेतं, असा प्रश्न यावेळी या मॅनेजरला विचारत त्याला कानशिलात लगावण्यात आलीये.
कंपनी मॅनेजर मनसे स्टाईलने जाब विचारताच मॅनेजरने या प्रकाराची कबुली दिलीये. याप्रकरणी पौड पोलीस स्टेशनमध्ये महिला कंपनीविरोधात तक्रार दाखल करणार आहेत.