जलवाहिनी फुटल्याने गेल्या आठ दिवसांपासून हडपसर भागातील पाणी पुरवठा विस्कळित .


दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दिनांक.११ पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा मनपाचा निर्णय .



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे :  जलवाहिनी फुटल्याने गेल्या आठ दिवसांपासून हडपसर भागातील पाणी पुरवठा विस्कळित झाला होता. त्यानंतर आता महानगरपालिके तर्फे या भागातील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दिनांक.११ पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पानमळा येथे १६०० मीमी व्यासाची जलवाहिनी फुटल्याने आठवडाभरापासून हडपसर, खराडीच्या भागात पाणी कपातीचा सामना करावा लागला. महापालिकेने खडकवासला धरणाच्या कालव्यातून तसेच भामा-आसखेड योजनेतून पर्यायी पाण्याची व्यवस्था केली होती, पण कमी दाबाने पाणी येणे, कमी वेळ पाणी यामुळे नागरिक ऐन दिवाळीत हैराण झाले होते. दोन दिवसांपूर्वी या भागातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला असताना आता पुन्हा दुरुस्तीचे काम काढले आहे.

लष्कर जलकेंद्रा अंतर्गत गुरुवारी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडिवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काडेपडळ, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर भागातली पाणी पुरवठा गुरुवारी बंद असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post