प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शिरोळ/प्रतिनिधीः
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिरोळ कारखान्याच्या गळीत हंगाम २०२१-२०२२ मधील दिनांक २१/१०/२०२१ ते ३१/१०/२०२१ अखेर गाळप झालेल्या ९१,९२०.८१८ मे.टन ऊसाचे एफआरपी प्रमाणे प्रतिटन रुपये २९२०/- प्रमाणे होणा-या ऊस बिलाची रक्कम २६ कोटी ८४ लाख ०८ हजार ७८८ रुपये इतकी विनाकपात सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले कारखान्याचा चालू गळीत हंगाम हा अत्यंत जोमाने सुरु असून सभासदानी आपला सर्व ऊस आपल्या कारखान्याकडेच गळीतास पाठविणेचे आवाहन केले. कारखाना नेहमीच सभासदांच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. यंदाच्या महापूराच्या संकटात ऊस उत्पादक शेतक-यांची अवस्था कठीण झालेली असली तरी कारखान्याकडे पूरबाधीत ऊस अग्रक्रमाने गाळप सुरु असुन याचे व्यवस्थापनामार्फत पूरेपूर नियोजन केले असलेचे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, व्हाईस चेअरमन श्रेणिक पाटील, सर्व संचालक मंडळ तसेच मॅनेजर फायनान्स एस. एम. भोसले यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.