बुधाजी गोपाळ चूडमुंगे हे एक तोळा सोन्याचे नेकलेसच्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शिरोळ/प्रतिनिधी:
येथील श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित केलेल्या लकी ड्रॉ योजनेमध्ये शिरोळमधील बुधाजी गोपाळ चूडमुंगे हे एक तोळा सोन्याचे नेकलेसच्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरले. द्वितीय बक्षीस अश्विनी संदीप कामत (कोंडिग्रे) यांना वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस राजेंद्र बबन कांबळे (कोंडिग्रे) यांना फ्रिज मिळाले. लकी ड्रॉ योजनेची सोडत दत्त उद्योग समूहाचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दत्त भांडारच्या प्रांगणात करण्यात आली.
दीपावली सणाच्या निमित्ताने श्री दत्त भांडारच्या वतीने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ ही योजना आयोजित केली होती. पाच हजार रुपयाच्या खरेदीवर लकी ड्रॉ चे एक कुपन ग्राहकांना देण्यात आले होते. २५० जणांनी यामध्ये भाग घेतला होता. यामध्ये विविध ५१ बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, व्हॉइस चेअरमन सौ. अनिता कोळेकर, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, डॉ. राजश्री पाटील, शामराव पाटील, आप्पासो मडिवाळ, विजयकुमार गाताडे यांच्यासह सर्व संचालक, दत्त कारखान्याचे संचालक विश्वनाथ माने, महेंद्र बागे, रघुनाथ पाटील, बाबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, नगरसेवक विठ्ठल पाटील, शेडशाळचे सरपंच गजानन चौगुले, उद्योगपती मयूरभाई, बबन कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्वागत दत्त भांडारचे व्यवस्थापक सदानंद घोरपडे यांनी केले. आभार संस्थेचे चेअरमन दामोदर सुतार यांनी मानले. यावेळी त्यांनी दत्त भांडारच्या प्रगतीचा आढावा घेऊन शिरोळ पंचक्रोशीतील ग्राहकांच्या विश्वासास दत्त भांडार पात्र ठरले असल्यामुळेच ग्राहकांचा ओढा दत्त भांडारकडे असल्याचे सांगितले.
दत्त भांडारच्या लकी ड्रॉ योजनेमधील इतर भाग्यवान विजेत्यांमध्ये अनिकेत कुपाडे, आश्लेषा खांडेकर, गजानन चौगुले, महेश पाटील, सुनील घोडके, पंकज पाटील, अमर चौगुले, दत्तात्रय चव्हाण, राकेश खडके, प्रदिप मगदूम, दत्त कामगार कॅन्टीन, शशिकांत साळगे, दिलीप गायकवाड, दिलीप पाटील, राजाराम आरगे, बाळासो शिंदे, राजाराम रावण, श्रीकांत कांबळे, अर्चना ककडे, रहीमतुला पटेल, शंकर कांबळे, शिवाजी आंबी, अमरसिंह पाटील, प्रकाश नुले, श्याम वाघमोडे, जितेंद्र अहिर, संजय रणखांबे, केशव चव्हाण, रामचंद्र गावडे, प्रशांत अपीणे, बाळेश्वर कोरे, परवेज मिस्त्री, अरुण गोधडे, दगडू खांडेकर, सौ. संगिता संजय पाटील कोथळीकर, सौरभ उगारे, सिद्धनाथ संस्था अर्जुनवाड, बापुसो आडके, राजेंद्र खाडे, प्रभाकर गोविलकर, मुसाभाई डांगे, इस्माईल चौगुले, दादासो कुपाडे, सचिन पाटील, रविराज तराळ, दादासाहेब कोळी, सुरज शेंडगे यांचा समावेश आहे.