प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शिरोळ/ प्रतिनिधी:
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी खासदार, सहकार महर्षी स्व. दत्ताजीराव बाबूराव कदम (आण्णा) यांच्या
पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या स्व. कदम आण्णांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांनी स्व. कदमआण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व. सा. रे. पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासही संचालक रणजित अशोक कदम यांनी, स्व. दिनकरराव यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक शेखर कलगोंडा पाटील यांनी व स्व. विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास निमंत्रीत संचालक दरगु गोपाळ माने-गावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलरव नाईक निंबाळकर, अण्णासाहेब पाटील जांभळीकर, जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्यासह सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, निजामसो पाटील, कामगार संचालक प्रदिप बनगे, आगर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, पी. जी. पाटील, उत्तम पाटील, जांभळीचे सरपंच खंडू खिलारे, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, शिवाजीराव कौलवकर-पाटील, बंडा मोरे तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, मॅनेजर फायनान्स संजय भोसले, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगन्ना, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, प्रा. मोहन पाटील, वर्क्स मॅनेजर संजॉय संकपाळ, सिव्हील इंजिनियर यशवंतराव माने, पर्यावरण मॅनेजर सुनिल पाटील, डिस्टीलरी मॅनेजर संजय यादव, सॅनेटरी इन्स्पेक्टर बाळासाहेब गावडे, गेस्टहौस इनचार्ज शक्तिजीत गुरव, परचेस ऑफिसर व्ही. टी. माळी, गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील, लेबर ऑफिसर जयदिप देसाई, हेड टाईम किपर राजेंद्र केरीपाळे, सुरक्षा अधिकारी एस. व्ही. घारगे, ऊर्जाकुर मॅनेजर व्ही. आर. इंगळे, आर. के. पाटील याचप्रमाणे कामगार सोसायटी, कामगार कल्याण मंडळ, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ (इंटक) या संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि कारखान्याचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.