सांगली जिल्हा बँक निवडणूकीत कवठेमहांकाळ सोसायटी गटात महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अजितराव घोरपडे मोठ्या मताधिक्याने विजयी

घोडपडे यांना ५४ मत मिळाली तर अपक्ष विठ्ठल पाटील यांना १४ मत मिळाली 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

सांगली : सांगली जिल्हा बँक निवडणूकीत कवठेमहांकाळ सोसायटी गटात महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अजितराव घोरपडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. घोडपडे यांना ५४ मत मिळाली तर अपक्ष विठ्ठल पाटील यांना १४ मत मिळाली आहेत.कवठेमहांकाळमध्ये ६८ मत असून याठिकाणी १०० टक्के मतदान पार पडले होते. आज सकाळी सुरु झालेल्या मतमोजणीत सकाळपासून धक्कादायक निकाल हाती येत आहेत.

जत सोसायटी गटात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून विद्यमान संचालक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत पराभूत झाले आहेत. त्यांचे विरोधक असलेल्या भाजपच्या प्रकाश जमदाडे यांना ४५ मत मिळाली तर विक्रम सावंत यांना ४० मत मिळाली. विषेश म्हणजे सावंत हे राज्याचे मंत्री विश्वजीत कदम यांचे मावस भाऊ आहेत.

काल जिल्हा बँकेसाठी ८५.३१ टक्के इतके मतदान झाले. बँकेच्या संस्था व व्यक्तिगत अशा एकूण २५७३ पैकी २१९५ मतदारांनी हक्क बजावला आहे. बँकेच्या २१ जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्यामुळे १८ जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या विद्यमान संचालकांसह ४६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. आज या बंद पेट्या उघडल्या जात असून यातून धक्कादायक निकाल हाती येत आहेत. महाविकास आघाडीच्या सहकार विकास पॅनेलला आणि भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलला किती जागा मिळणार? याचे गणित सध्या मांडले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post