कर्जत नगरपरिषदच्या हद्दीत चांगले रस्तेवर होणार पुन्हा खर्च

  ठेकेदार होणार पुन्हा मालामाल  ....शरद लाड यांनी केले आरोप




प्रेस मेडिया वृत्तसेवा

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील


 कर्जत नगरपरिषद हद्दीमधील दहिवली भागातील चार रस्त्यांच्या आरसीसीस काँक्रिटीकरण कामासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने 17 कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र त्या मंजूर रस्त्यापैकी तीन रस्त्यांची कामे 2019 मध्ये कर्जत नगरपरिषद कडून करण्यात आली होती.दरम्यान,सुस्थितीत असलेल्या त्या तीन रस्त्यांवर साडे तेरा कोटी रुपये निधी कशासाठी खर्च केला जात आहे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपस्थित करण्यात आला आहे.  

   कर्जत शहरात राज्य सरकारच्या नगरविकास विभाग आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी कर्जत शहरातील रस्त्यांच्या कामासाठी निधी दिला आहे. त्यात कर्जत शहरातील दहिवली भागातील चार रस्त्यांच्या कामासाठी 17कोटींचा निधी दिला आहे.कर्जत शहरातील दहिवली भागातील ततेर फ्लोरेन्स ते अभियांत्रिकी कॉलेज,समर्थनगर ते सुयोगनगर अंतर्गत रस्ता आणि पेट्रोल पंप ते फ्लोराईड या भागातील रस्ता अशा तीन रस्त्यांसाठी तब्बल साडेतेरा कोटी आणि जुना वेणगाव रस्ता तयार करण्यासाठी अडीच कोटींचा निधी नगरविकास विभागाने मंजूर केला आहे.या निधीमधून मंजूर करण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे कर्जत नगरपरिषदेने 2019 मध्ये पूर्ण केली आहेत. त्यातील तीन रस्त्यांचे डांबरीकरण कर्जत नगरपरिषदेने केले त्याच रस्त्यांवर एमएमआरडीए कडून करोडो रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. त्यातील जुना  वेणगाव रस्ता वगळता अन्य सर्व रस्त्याची आजची अवस्था सुस्थितीत अशीच आहे. 


 त्या रस्त्यांवर वाहतूक देखील फार कमी असताना त्या रस्त्यांची कामे नव्याने तब्बल साडेतेरा कोटी रुपये खर्चून केली जाणार आहेत. हे कशासाठी आणि कोणाच्या फायद्यासाठी असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे. ज्या रस्त्यांची खऱ्या अर्थाने कर्जत शहराला गरज आहे,त्या कर्जत चारफाटा ते भिसेगाव या रस्त्याचे काम कर्जत नगरपरिषद करताना दिसत नाही. ते काम गेली चार महिन्यापासून रखडले आहे,मात्र सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवर डांबर उखडून सिमेंट काँक्रिटीकरण एमएमआरडीए आणि नगरविकास विभाग कोणाच्या फायद्यासाठी करू पाहत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.या रस्त्यांबाबत माजी नगरध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद लाड यांनी पालिका मुख्याधिकारी यांना पत्र देऊन शासनाचा निधी खर्च करताना अस्तित्वात असलेल्या रस्त्याबाबत अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. त्यावर पालिका मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी आपण रस्त्यांची पाहणी करून अहवाल पालिकेच्या सभागृहात ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर हा निधी आणण्याचे प्रयत्त्न करणारे पालिकेचे स्वीकृत नगरसेवक शिवसेनेचे संकेत भासे यांनी आम्ही आणले;ला निधी योग्य कामांवरच खर्च केला जाणार असल्याने त्यावर आक्षेप घेऊ नये अशी सूचना पालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post