पोलिस लवकरात लवकर कारवाई करतील आणि चोरांच्या मुसक्या आवळतील अशी अपेक्षा करतो.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
उलवे - उलव्यातील पत्रकार प्रकाश म्हात्रे यांच्या मालकीचा टाटा कंपनीचा 1613 मॉडलचे MH 06 AQ 1197 डंपर काही काळा पासून उलवे सेक्टर १८ प्लॉट नंबर ९१ जवळ बंद अवस्थेत पडून होता. या दोन ब्रास डंपरचे २०११ पासून रोड टॅक्स, इन्शुरन्स, फिटनेस, परमीट असे कोणतेही कागदपत्र अस्तीत्वात नसल्याने बंद अवस्थेत ठेवण्यात आला होता. कोरोंना काळानंतर काही दिवसापूर्वी सदर ठिकाणी डंपर दिसून न आल्याने आजूबाजूला शोध घेतला असता सदर डंपर आढळून आले नाही. त्यामुळे दि. ०९/०८/२०२१ आणि दी. २२/१०/२०२१ रोजी RTO पनवेल आणि पोलीस आयुक्त नवी मुंबई यांना लेखी तक्रार देण्यात आली.
या डंपरचा अधिक शोध घेतला असता MH 06 AQ 1197 या नंबरचा डंपर आढळून येत नव्हता. परंतु न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उलवे परिसरात संशयित रित्या एक टँकर रंग बदलून, नंबर प्लेट, बॉडी अशी मूळ ओळख नष्ट करून MH 04 DK 7154 अशी बनावट नंबर प्लेट लावून पाण्याचे टँकर वावरत असल्याचे समजले. MH 04 DK 7154 या नंबरचे आणखी एक पाण्याचे टँकर सचिन रघुनाथ भगत रा. शेलघर यांचे असून त्याच्या सोबतच सेम नंबरचा दूसरा टँकर एकत्र उभे असताना दिसून आल्याने संशय अधिक बळावला. त्यामुळे या बाबत अधिक तपास केला असता MH 04 DK 7154 या एकाच नंबरचे दोन्ही टँकर सचिन रघुनाथ भगत रा. शेलघर ता. पनवेल हेच चालवत असून त्यातील एक टँकर प्रकाश म्हात्रे यांचा डंपर MH 06 AQ 1197 असल्याची खात्री होऊ लागली.
त्यातच पोलिस आयुक्तांकडून न्हावशेवा पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रार अर्जाच्या चौकशी साठी प्रकाश म्हात्रे यांना पोलिस ठाण्यात बोलावले असता पोलिसांना सविस्तर माहिती देण्यात आली. न्हावाशेवा पोलिसांनी अधिक तपास केला असता सचिन रघुनाथ भगत यांनीच डंपर चोरी करून, डंपरची मूळ ओळख नष्ट करून, बेकायदेशीर पाण्याची टाकी बसवून, बनावट नंबरप्लेट लावून, विना कागदपत्र बेकायदेशीर चालवत असल्याचे तपासात दिसून आल्याने न्हावशेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर भटे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आणि त्यानुसार ठाणे अंमलदर ए.पी.आय. जाधव यांनी दि. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सचिन रघुनाथ भगत रा. शेलघर यांच्यावर गुन्हा रजि. नंबर ०१७६/२०२१ कलम ३७९ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
-----------------------
MH 06 AQ 1197 या माझ्या डंपरची चोरी करून डंपरची बॉडी विकून सचिन भगत यांनी गुन्हा केला आहे. तसेच डंपरची मूळ ओळख नष्ट करून, बेकायदेशीर पाण्याची टाकी बसवून पुरावे नष्ट करण्यात आले. बनावट नंबरप्लेटचा वापर करून विना कागदपत्र टँकर चालवून शासनाची फसवणूक करण्यात आली. त्यामुळे चोरी करणे, चोरीचा माल विकणे, बनावट नंबरप्लेट व कागदपत्र तयार करणे, विना कागदपत्र गाडी चालवणे अशा अनेक कलमांखाली सचिन रघुनाथ भगत यांनी गुन्हा केला आहे. तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास करून त्यांच्यावर पोलिस लवकरात लवकर कारवाई करतील आणि चोरांच्या मुसक्या आवळतील अशी अपेक्षा करतो.
- प्रकाश म्हात्रे