रसायनी मोहोपाड्यातुन सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता .

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

मोहोपाडा येथील अजित सावंत यांच्या चाळीत राहणारी कु.कांतीकुमारी विजय कहार वय 17वर्षे,1 महिना हि बेपत्ता असून याबाबत विजय बबन कहार (वय ५३ वर्षे )यांनी 

रसायनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. बेपत्ता  कु.कांतीकुमारी विजय कहार  वय १७ वर्षे १ महीने , उंची ४ फुट ५ इंच , चेहारा गोल , डोळे काळे , हातात हिरव्या रंगाने गोरी , उंची - १५५ सेमी अंदाजे , अंगाने सडपाताळ , नेसुस - लाल रंगाचा पंजाबी ड्रेस , केस काळे , चेहरा – उभा अशा वर्णनाची राहत्या घरातून  29 सप्टेंबर रोजी निघून गेली असून ती बेपत्ता झाल्याची खबर पोलिसांना दिनांक 5-11-21 रोजी केली आहे.कांतीकुमारी विजय कहार हिच्या अज्ञानपनाचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फुस लावुन कोठेतरी  पळवून नेले असून याबाबत रसायनी पोलीस ठाणे येथे गुन्हा भादवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर अधिक तपास करीत आहेत.




जगदीश अंगडी : कार्यकारी संपादक : 

Post a Comment

Previous Post Next Post