प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल तालुका सांस्कृतिक सेल व नादब्रह्म साधना मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०५ नोव्हेंबर रोजी रांजणपाडा (खारघर) येथे 'दिवाळी पहाट २०२१' या सुमधूर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा दिवाळी पहाटचे ११ वे वर्ष आहे.
सकाळी ०७ ते सकाळी १० वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असून खारघर सेक्टर २७ मधील मॉर्निंग प्ले स्कुल समोरील प्लॉट क्रमांक ३६ येथे हा कार्यक्रम होणार आहे. या सांस्कृतिक सोहळ्यात प्रसिद्ध गायक पंडित नंदकुमार पाटील, भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी, मोतीराम कडू, अरुण म्हात्रे, जगन्नाथ मढवी यांचे गायन सादर होणार आहे. यावेळी पखवाजवर सुनिल म्हात्रे, किरण भोईर, तबला निषाद पवार व विनायक प्रधान, हार्मोनियमवर नंदकुमार कर्वे यांची तर सूत्रसंचालक म्हणून नितेश पंडीत यांची साथ असणार असून या संगीत कार्यक्रमाचा जास्तीत जास्त श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष रायगड भूषण पंडित उमेश चौधरी, मंगेश चौधरी व अक्षय चौधरी यांनी केले आहे.