राज्यातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील :
शैक्षिणक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वी राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून संपुर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या या दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कॄतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी, यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने गेल्या १९ वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यंदा ही २० वी स्पर्धा आहे.
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस ७५ हजार रुपये, व्दितीय क्रमाकांस ३५ हजार तर तॄतीय क्रमाकांस २० हजार रूपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कॄष्ट कथेसाठी ०७ हजार रूपये, उत्कॄष्ट कविता व उत्कॄष्ट व्यंगचित्रास प्रत्येकी २५०० रूपये, उत्कृष्ट विशेषांकास ०५ हजार रुपये, उत्कृष्ठ मुखपृष्ठ ०५ हजार रुपये, त्याचबरोबर बालसाहित्याच्या सवोत्कॄष्ट अंकास ७५०० रूपये तसेच रायगड जिल्हयातून प्रकाशित होणाऱ्य